रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:50+5:302021-07-01T04:27:50+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, गंभीर आजारातील रुग्णांसह प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होणाऱ्या महिला, अपघातात जखमी होणाऱ्यांना वेळप्रसंगी रक्त न मिळाल्याने त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. ही बाब लक्षात घेऊन वीर भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप, जय महाकाल मित्रमंडळाने २९ जूनरोजी रक्तदान शिबिर घेतले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, रक्तपेढीप्रमुख पी. एम. मोरे, के. ए. लोणकर, बी. एस. हरण, के. बी. टार्फे, सुभाष फुके, सचिन दंडे, लक्ष्मण काळे, संजय गोडे, शालिनी सावळे, लक्ष्मणअण्णा मादसवार, सुरेश माहुले, बंडू मारशेट्टीवार, दिलीप जोशी, हुकूम तुर्के, नरसिंग राजपुत, मंजुश्री जांभरुणकर, संगीता इंगोले, सोनाली गर्जे, रूपाली देशमुख, टेकाळे आदींची उपस्थिती लाली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दीपकअण्णा मादसवार, संग्रामसिंह ठाकूर यांच्यासह विजय परळकर, रणजितसिंह ठाकूर, अल्लम श्रीधर, अन्नू नकले, जगदीश नकले, विशाल वाठोरे, अक्षय मापारी, अजय सुरडकर, सूरज कोठेकर, अभिषेक ठाकूर, कैलास संगत, मनोज शर्मा, बबलू शर्मा, दीपक पवार, शाहरुख पठाण, शेख सोहील, संदीप उंडाळ, धीरज माउले, नरेश कदम, आकाश भाग्यवंत, मंगेश गंगावणे, नकुल भालेराव, करण जाधव, धीरज राठोड, मदन एकाडे आदींनी पुढाकार घेतला.