वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:56 PM2018-04-10T15:56:01+5:302018-04-10T15:56:01+5:30

वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रियेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी मंगळवारी दिली. 

Spontaneous response to crop loan allocation process in Washim district! | वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

googlenewsNext
ठळक मुद्दे चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलले. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते.

 
वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रियेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी मंगळवारी दिली. 
२०१६ च्या खरीप हंगामामध्ये प्रशासनाने ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बाळगले होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत प्रत्यक्षात ८९० कोटी रुपये वाटप झाला होता. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत अर्थात १५ जुलै २०१७ पर्यंत केवळ ३१० कोटी रुपयेच (२७ टक्के) कर्ज वाटप झाले होते. कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नव्हते. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही, हे त्यामागील प्रमुख कारण होते. यंदा मात्र राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रदान केली असून अनेक शेतकरी सद्या कर्जमुक्त झाले आहेत. त्यामुळेच सुरूवातीच्या टप्प्यातच खरीप पीक कर्ज घेण्यास जिल्ह्यातील शेतकºयांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Spontaneous response to crop loan allocation process in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.