‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेस जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, ४२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:15+5:302021-07-14T04:46:15+5:30
लोकमत समूहाकडून रक्ताचं नातं या अभियानांतर्गत व भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य ...
लोकमत समूहाकडून रक्ताचं नातं या अभियानांतर्गत व भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात तथा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे यांच्या नेतृत्वात कारंजा नागरी सहकारी पंतसंस्थेच्या सहयोगाने १२ जुलै रोजी रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात २१ दात्यांनी रक्तदान केले. यामध्ये चार महिलांचा सहभाग होता. शिबिराचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे, तसेच भाजप संघटन सरचिटणिस सुनील राजे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, कारंजा नागरी सहकारी पंतसंस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ डोणगांवकर, बंटी डेंडुळे, माजी बांधकाम सभापती पल्लवी डेंडुळे, संदीप काळे यांच्या उपस्थितीत झाले.
---------------
मान्यवरांच्या भेटी
कारंजा येथे आयोजित रक्तदान शिबिरात भाजप संघटन सरचिटणिस सुनील राजे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, कारंजा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ डोणगांवकर, डाॅ. मनोज गिदवानी, डाॅ. सुशील देशपांडे, श्याम सवाई, वियज गाढवे, ललीत चांडक, प्रज्वल गुलालकरी, सुरेश गिरमकार यांनी भेटी दिल्या.
-------------
पित्याच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी रक्तदान
शिरपूर येथील जयंत कान्हेड यांच्या वडिलांचे दोनच दिवसांपूर्वी निधन झाल्याने कान्हेड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तथापि, अशाही स्थितीत जयंत कान्हेड यांनी शिरपूर येथे ‘लोकमत’कडून आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.