संचारबंदीला मालेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:43+5:302021-04-22T04:41:43+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मंगळवारी कोरोना नियंत्रणात अण्णायसाठी अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मालेगाव ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मंगळवारी कोरोना नियंत्रणात अण्णायसाठी अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मालेगाव शहरात २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच बंद झाले. याकरिता नगर पंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ११ वाजताच सर्व दुकाने बंद करण्यात आली. अनेक नागरिकसुद्धा ११ वाजताच घरी जाण्यास निघाले. अवघ्या काही वेळात रस्स्यावर शांतता पसरली. कोरोना संसर्ग हा झपाट्याने वाढत असून प्रत्येक नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. काही लोक या लॉकडाऊनमध्ये गैरफायदा घेत आहेत. अनेक व्यावसायिक तर काही अत्यावश्यक सेवावाले बंद दाराआड चढ्या भावाने वस्तूंची विक्री करत आहेत.
००
बॉक्स
विनाकारण फिरणाऱ्याची चाचणी करावी...
मालेगाव शहर व तालुक्यात अनेकजण विनाकारण फिरत असल्याचे दिसून येते. शहरात सकाळी ११ वाजतानंतरसुद्धा अनेक लोक विनाकारण फिरताना आढळत आहेत. अश्या लोकांची अँटिजन टेस्ट जागेवरच करावी. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना चाप बसेल.
००
प्रशासनाच्या नियमाचे पालन करून अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराच्या बाहेर पडू नये
डॉ. विकास खंडारे
मुख्याधिकारी न.प. मालेगाव