समता फाउंडेशनच्या लसीकरणात करडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:54+5:302021-07-14T04:46:54+5:30
७ जुलै ते ८ जुलैदरम्यान करडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यादरम्यान करडा येथील तब्बल ...
७ जुलै ते ८ जुलैदरम्यान करडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यादरम्यान करडा येथील तब्बल ५३४ स्त्री-पुरुषांचे लसीकरण करण्यात आले. करडा ग्रामपंचायत सरपंच गंगा वसंतराव देशमुख यांनी समता फाउंडेशनने लसीकरण मोहीम करडा येथील नागरिकांसाठी राबवावी, अशी विनंती एका पत्राद्वारे समता फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांच्याकडे केली होती. त्या पत्राची दखल घेत लसीकरण कार्यक्रम करडा येथे घेण्यात आला. यावेळी पुरुषोत्तम अग्रवाल यांचे वर्गमित्र संजय उकळकर यांनी लसीकरण स्थळी उपस्थित राहून अधिकाधिक लसीकरण होईल यासाठी गावकऱ्यांना व स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. ५३४ करडेकर नागरिकांचे लसीकरण पार पडले असून, कोरोनाविरुद्ध लढाईत नागरिकांना सुरक्षित केले आहे. यावेळी समता फाउंडेशनकडून राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत समताचे डॉक्टरसह सर्वच कर्मचारी यांचे नियोजन अतिशय कौतुकास्पद होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने लसीकरणसंदर्भात व विविध आजार व लसीकरण याबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी करडा पं.स. सर्कलचे सदस्य संदीप धांडे, सरपंच गंगा वसंतराव देशमुख, उपसरपंच ॲड. गजानन देशमुख, प्रा. वसंतराव देशमुख, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष जीवनभय्या देशमुख, आशा सेविका वैशाली देशमुख, शीला देशमुख, अंगणवाडी सेविका रेखा धांडे, नबूताई देशमुख, शिक्षण समिती अध्यक्ष भुजंगराव देशमुख, राजेश देशमुख, भागवतराव देशमुख आदींसह स्पर्धा परीक्षा अभ्याससमूह सदस्य, युवक व गावकरी उपस्थित हाेते.