सत्संगाच्या प्रसारासाठी पाच वर्षांपासून स्वखर्चाने शिवरात्री उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 03:03 PM2019-03-02T15:03:03+5:302019-03-02T15:03:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी, युवकांना सत्संगाचा मार्ग कळावा, या उद्देशाने तालुक्यातील धानोरा बु. येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी, युवकांना सत्संगाचा मार्ग कळावा, या उद्देशाने तालुक्यातील धानोरा बु. येथील लोभाजी निवृत्ती वाकूडकर, हे स्वखर्चाने गावात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करीत आहेत. यात किर्तनासह महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रमही होतो. यंदा ४ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
धानोरा बु. येथील लोभाजी वाकुडकर हे व्यवसायाने शेतकरी आहेत. युवावस्थेत असतानाच वाईट व्यसनांमुळे युवकांचे आणि समाजाचे होणारे नुकसान धानोरा बु. त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गावात शांततेचे सलोख्याचे वातावरण तयार व्हावे, युवकांनी व्यसनांचा मार्ग सोडावा म्हणून ते धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू लागले. या कार्यक्रमांसाठी लागणारा सर्व खर्च ते स्वत:च करतात. याच अंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी गावात स्वखर्चाने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या उत्सवात नामवंत किर्तनकारांना स्वखर्चाने पाचारण करून त्यांच्याकडून ते समाजात किर्तनाद्वारे जनजागृती घडवित आहेत. महाशिवरात्रीनिमित्त नामवंत किर्तनकारांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावाकºयांना महाप्रसाद वितरणही ते करतात. यासाठी त्यांना सर्व गावकºयांचे यथोचीत सहकार्य लाभत असून, त्यांच्या उपक्र मामुळे गावात धार्मिकवृत्तीकडे लोकांचा कलही वाढला आहे. यंदाही ४ मार्च रोजी त्यांनी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले असून, यावेळी किर्तनासाठी हभप बाळू महाराज गिरगावकर यांना आमंत्रित केले आहे. त्यांच्या साथीला मृदंग वादक, हभप गजानन महाराज कव्हर, गायनाचार्य हभप दामोदर महाराज इंगोले, हभप आसाराम महाराज, हभप गजानन महाराज भोयर, हभप भत्तऊराव महाराज, हभप मदन महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज, तसेच वांगी येथील गजानन महाराज हे गायनाचार्य म्हणून राहणार आहेत.