सोंगलेल्या सोयाबीनला फुटताहेत कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:48 PM2017-10-15T19:48:23+5:302017-10-15T19:48:46+5:30
पार्डी ताड: परतीच्या पावसाचा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, पार्डी ताड शिवारात परतीच्या पावसाच्यामुळे जमिनीत ओल निर्माण झाल्याने शेतक-यांनी शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड: परतीच्या पावसाचा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, पार्डी ताड शिवारात परतीच्या पावसाच्यामुळे जमिनीत ओल निर्माण झाल्याने शेतक-यांनी शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत.
पार्डी ताड परिसरात आठ दिवस परतीच्या पाऊस पडला. यामुळे शेतकºयांना सोंगून ठेवलेले सोयाबीन उचलणेच शक्य झाले नाही. या सोयाबीनच्या पेड्यां जागेवरच भिजल्या आणि जमिनीतील ओलाव्यामुळे आता या पेंड्यांमधील सोयाबीनच्या शेंगानाच कोंब फुटत आहे. या समस्येपासून सुटका मिळावी म्हणून शेतकरी सोयाबीनच्या पेंड्या उलटून ठेवत असतानाच पुन्हा पावसाचे आगमन होऊन या पेंड्या भिजत आहेत. त्यामुळे शेगांनी ओलावा धरला असून, आता त्यामधील सोयाबीनला कोंब फुटत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता सोंगून ठेवलेल्या सोयाबीनची काढणी करावी, की नाही, हाच विचार शेतकºयांना पडला आहे.