लोंबकळलेल्या विद्यूत तारेचा एस.टी. बसला स्पर्श; प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 06:21 PM2018-08-26T18:21:12+5:302018-08-26T18:22:38+5:30

तळप बु. : मानोरा -दारव्हा रोडवरील तळप बु. गावानजिक दारव्हा आगाराच्या एस.टी. बसला लोंबकळलेल्या जीवंत विद्यूत तारेचा स्पर्श झाला.

ST bus touch electricity wires at washim distrist | लोंबकळलेल्या विद्यूत तारेचा एस.टी. बसला स्पर्श; प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

लोंबकळलेल्या विद्यूत तारेचा एस.टी. बसला स्पर्श; प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

Next
ठळक मुद्देवीज प्रवाह असलेल्या तथा लोंबकळलेल्या तारेचा बसला स्पर्श झाला.बसचालकाने क्षणाचाही विलंब न करता बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरविले. नागरिकांनी बसवर लोंबकळत पडून असलेली विद्यूत तार हटविण्याकामी पुढाकार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क
तळप बु. : मानोरा -दारव्हा रोडवरील तळप बु. गावानजिक दारव्हा आगाराच्या एस.टी. बसला लोंबकळलेल्या जीवंत विद्यूत तारेचा स्पर्श झाला. २६ आॅगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेदरम्यान बसचालक व प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
तळप बु. गावानजिक वीज प्रवाहित तार अनेक दिवसांपासून लोंबकळलेल्या अवस्थेत असून त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मानोरा येथून दारव्हाकरिता निघालेली दारव्हा आगाराची बस (क्रमांक एम.एच.१२/ सी.एच. ७६०८) तळपनजिक येताच वीज प्रवाह असलेल्या तथा लोंबकळलेल्या तारेचा बसला स्पर्श झाला. यामुळे संपूर्ण एस.टी. बसमध्ये विजेचा प्रवाह संचारला. याची जाणीव होताच बसमध्ये बसून असलेल्या १५ प्रवाशांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, बसचालकाने क्षणाचाही विलंब न करता बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरविले. यावेळी प्रवासी व ‘मॉर्निंग वॉक’ला जात असलेल्या काही नागरिकांनी बसवर लोंबकळत पडून असलेली विद्यूत तार हटविण्याकामी पुढाकार घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळू शकला.

Web Title: ST bus touch electricity wires at washim distrist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.