कोरोना पसरू नये म्हणून एसटीचे होणार कोटिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:22+5:302021-08-12T04:46:22+5:30
अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग प्रक्रिया बसेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी एसटी पहिली वाहतूक संस्था आहे. कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचे चाक ...
अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग प्रक्रिया बसेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी एसटी पहिली वाहतूक संस्था आहे. कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचे चाक थांबले होते. आता एसटी सुरू असली तरी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बसमध्ये अनेक ठिकाणी प्रवासी स्पर्श करतात. ज्यामुळे कोरोना व इतर विषाणूंच्या प्रसाराचा धोका असतो. तो टाळण्यासाठी एसटीने बसेसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १४९ बसगाड्यांना या अंतर्गत मायक्रोबियल कोटिंग केले जाणार आहे.
असा मथळा आपल्याला करता येईल.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) जिल्ह्यातील आगार आणि बसेस
आगार - बसेस
वाशिम - ४९
कारंजा - ४०
मंगरूळ - ३१
रिसोड - ३९
(जिल्ह्यातील आगाराच्या संख्येनुसार यात बदल करावा)
२) महिनाभरात एसटी होणार कोरोनामुक्त
एसटी बसगाड्यांना मायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया विभागीयस्तरावरील कार्यशाळेत पार पाडली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील चार आगारांत असलेल्या बसगाड्यांच्या संख्येची माहिती आणि प्राधान्यक्रमाबाबत विभागीयस्तरावर कल्पना देण्यात आली असून, येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्वच आगारातील बसगाड्यांचे कोटिंग होऊन त्या कोरोनामुक्त केल्या जाणार आहेत.
--------------------
३) आतापर्यंत एसटीचा सॅनिटायझरवर ८ लाखांवर खर्च
जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू लागल्यानंतर काही काळाने एसटीची प्रवासीसेवा बंद ठेवण्यात आली, तर ती सुरू करण्यात आल्यानंतर सॅनिटायझेशन करूनच बसगाड्या सोडण्याचे निर्देश होते. त्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी आगारांनी केली. त्यात गत सव्वा वर्षाच्या काळात चारही आगारांना मिळून एसटीच्या सॅनिटायझरवर ८ लाखांपेक्षा अधिक खर्च झाल्याचे माहितीवरून समजते.
--------------------
४) आगारप्रमुखांचा कोट
कोट: एससटी बसगाड्यांना मायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया विभागीयस्तरावरील कार्यशाळेत पार पाडली जाणार आहे. यासाठी सर्व माहिती विभागस्तरावर देण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने एसटी बसगाड्या विभागीय कार्यशाळेत पाठविल्या जाणार आहेत.
-विनोद इलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम
------------