एसटी महामंडळाचे ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ ‘गुगल प्ले स्टोर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:43 AM2020-01-25T11:43:02+5:302020-01-25T11:43:07+5:30

प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, हे अ‍ॅप ‘गुगल प्लेस्टोर’ वर उपलब्ध झाले आहे.

ST Corporation's Vehicle Tracking App on the Google Play Store | एसटी महामंडळाचे ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ ‘गुगल प्ले स्टोर’वर

एसटी महामंडळाचे ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ ‘गुगल प्ले स्टोर’वर

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) त्यांच्या बसगाड्यांची मार्गावरील इत्तंभूत माहिती प्रवाशांना मिळावी म्हणून ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ विकसीत केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, हे अ‍ॅप ‘गुगल प्लेस्टोर’ वर उपलब्ध झाले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या अनेकदा विलंबाने धावतात. नियोजित बसस्थानकावर बस केव्हा पोहोचेल, हे प्रवाशांना माहित नसते. तसेच बसमध्ये बिघाड झाला असल्यास किती वेळ लागेल आणि नेमकी बस कोठे आहे, याची माहिती परिवहन महामंडळालाही मिळत नाही. यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळाने ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ विकसीत केले आहे. यामुळे प्रवासी, तसेच एसटीच्या संबंधित आगारांना त्यांच्या सर्व बसगाड्यांची मार्गावरील स्थिती कळू शकणार आहे. त्यातच प्रवाशांनाही ही माहिती मिळणार असल्याने बससाठी बसस्थानकावर किंवा थांब्यावर तासनतास ताटकळत बसावे लागणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाºया बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, लवकरच इतर सर्व विभागाच्या बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. सदर अ‍ॅप हे जीपीएस यंत्रणेवर आधारित आहे. या अ‍ॅपद्वारे आपल्या जवळपासची बसस्थानके, तेथे येणाºया-जाणाºया बसगाड्यांचे क्रमांक, मार्ग आणि आणि लोकेशन इत्यादी माहितीही मिळणार आहे. हे अ‍ॅप ‘गुगल प्लेस्टोर’वर उपलब्ध करण्यात आले असून, स्मार्ट फोनधारकांना हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करता येणार आहे.

 

Web Title: ST Corporation's Vehicle Tracking App on the Google Play Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.