एसटी कर्मचाऱ्यांच्या उपदानात दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 02:49 PM2019-06-22T14:49:42+5:302019-06-22T14:49:48+5:30
वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅच्युईटी) रकमेत केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅच्युईटी) रकमेत केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता एसटी कर्मचाºयांना दहा लाखांऐवजी वीस लाख रुपये उपदान रक्कम मिळणार आहे. २९ मार्च २०१८ पासून याचा लाभ देण्यात येत असून, या तारखेला किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या किंवा सेवेतून कमी केलेल्या परंतु उपदानास पात्र कर्मचाºयांना यातील फरकाची रक्कम मिळणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात २० जून रोजी परिपत्रक जारी करून सर्व विभाग नियंत्रकांना याची अमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
केंद्र शासनाने उपदान प्रदान अधिनियम १९७२ नुसार द्यावयाच्या उपदानाची कमाल मर्यादा १७ मे २०१० च्या अध्यादेशाद्वारे १० लाख रुपये केली होती. कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक २८ जून २०१० नुसार ही कमाल मर्यादा एसटी महमांडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांनाही लागू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासनाने २९ मार्च २०१८ ला राजपत्रित अधिसुचना काढून उपदानाच्या कमाल मर्यादेत सुधारणा केली आहे. यानुसार आता उपदानाची मर्यादा १० लाखांहून २० लाख करण्यात आली असून, ही कमाल मर्यादा २९ मार्च २०१८ पासूनच लागू करण्याची अधिसुचना केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने प्रसारित केलेली आहे. या पृष्ठभुमीवर एसटी महामंडळाने अधिसुचनेची अमलबजावणी करण्याबाबत २० जून रोजी परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांना पुरवणी उपदानासह उपदानाची कमाल मर्यादा २० लाख रुपये लागू केली आहे. या परिपत्रकानुसार मार्च २०१८ मध्ये एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले किंवा अन्य कारणांमुळे २९ मार्च २०१८ पासून सेवेतून कमी झालेल्या; परंतु उपदानास पात्र असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जुन्या कमाल मयार्देप्रमाणे अदा केलेल्या उपदानाप्रकरणी नवीन कमाल मर्यादेनुसार फरकाचे देयक अदा करण्याच्या सुचना सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.