एसटी कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणी कालावधी आता वर्षभराचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:26 AM2017-10-02T01:26:45+5:302017-10-02T01:30:43+5:30

वाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील (एसटी) वर्ग ३  आणि ४ मधील कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी  आता तीन वर्षांवरून केवळ एक वर्ष करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे गत १ एप्रिल २0१७ पर्यंत ज्या कर्मचार्‍यांनी एक  वर्षाचा कालावधी समाधानकाररीत्या पूर्ण केला असेल, अशा  कर्मचार्‍यांनाही या निर्णयाचा लाभ देण्याचे  निर्देश महामंडळाने  दिले असल्याची माहिती एसटीच्या विभागीय अधिकार्‍यांनी  दिली. 

ST employees' junior pay scale period now a year! | एसटी कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणी कालावधी आता वर्षभराचाच!

एसटी कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणी कालावधी आता वर्षभराचाच!

googlenewsNext
ठळक मुद्देवर्ग ३, ४ श्रेणीतील कर्मचार्‍यांना लाभ १ एप्रिल २0१७ पासूनच लागू करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील (एसटी) वर्ग ३  आणि ४ मधील कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी  आता तीन वर्षांवरून केवळ एक वर्ष करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे गत १ एप्रिल २0१७ पर्यंत ज्या कर्मचार्‍यांनी एक  वर्षाचा कालावधी समाधानकाररीत्या पूर्ण केला असेल, अशा  कर्मचार्‍यांनाही या निर्णयाचा लाभ देण्याचे  निर्देश महामंडळाने  दिले असल्याची माहिती एसटीच्या विभागीय अधिकार्‍यांनी  दिली. 
एसटी महामंडळातील वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचार्‍यांच्या  कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी पूर्वी तीन वर्षे होता. हा  कालावधी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कर्मचार्‍याला नियमित वे तनश्रेणीवर सामावून घेतले जात होते. आता हा कालावधी तीन  वर्षावरून एक वर्षाचा करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.  विशेष म्हणजे या निर्णयानंतर कनिष्ठ वेतनश्रेणीत सहा महिने  कालावधी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कर्मचार्‍यास वैयक्तिक वे तनश्रेणीही लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला  आहे. महामंडळाच्या निर्णयानुसार ज्या कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वे तनश्रेणीचा कालावधी १ एप्रिल २0१७ रोजी पूर्ण झालेला  असेल, अशा कर्मचार्‍यांनाही नियमित वेतनश्रेणीत समावून घे तले जाणार आहे. अर्थात एसटी महामंडळाचा निर्णय १ एप्रिल   २0१७ पासूनच लागू होणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २0१७  किंवा त्यानंतर पुढे कनिष्ठ वेतनश्रेणीचा वर्षभराचा कालावधी  पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.  

वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचार्‍यांच्या कनिष्ठ वेतनश्रेणीचा  कालावधी १ वर्षाचा करण्यात आल्याची माहिती आहे. या  संदर्भात विभागीय नियंत्रकांकडे अधिक माहिती आहे. अकोला  विभागातील किती कर्मचार्‍यांना या निर्णयाचा फायदा होईल, हे  सध्या निश्‍चित सांगता येणार नाही. 
- सचिन क्षीरसागर 
विभागीय वाहतूक नियंत्रक, अकोला परिवहन विभाग

Web Title: ST employees' junior pay scale period now a year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.