एसटी कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून एकच दिवस काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:09 PM2020-06-12T17:09:59+5:302020-06-12T17:10:18+5:30
एसटीच़्या कर्मचाºयांना आवश्यकतेनुसार आठवड्यातून एकच दिवस कामावर पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) जिल्हांंतर्गत प्रवासी वाहतूक वगळता ईतर कामकाज बंद आहे. त्यातच अनेक फेºयाही बंद ठेवण्यात आल्या. ही बाब लक्षात घेऊन एसटीच़्या कर्मचाºयांना आवश्यकतेनुसार आठवड्यातून एकच दिवस कामावर पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महामंडळाने ११ जून रोजी हे आदेश दिले आहेत.
एसटी महामंडळाच्या दैनंदिन संचालनासाठी चालक, वाहकांची दैनंदिन कामगिरी निश्चित करण्यात येते. लॉकडाऊनच्या काळात जिल्हांतर्गत मार्गावरील वाहतूक वगळता इतर सर्व वाहतूक बंद आहे. असे असतानाही सर्व चालक, वाहकांचे दैनंदिन काम निश्चित करून कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात येते; परंतु प्रत्यक्षात कर्तव्यावर बोलावण्यात आलेल्यांपैकी सर्व चालक, वाहकांना कर्तव्यावर पाठविले जात नाही. त्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन एक दिवस आधीच करून आवश्यक त्या प्रमाणातच चालक, वाहकांना कर्तव्यावर बोलविण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. समय वेतनश्रेणीतील चालक, वाहकांना आठवड्यातून किमान एक दिवसच काम मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सुचनाही महामंडळाकडून सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.