एसटी कर्मचाऱ्यांचा संप ; वाशिम, मंगरुळपीर येथे प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:14 PM2018-06-08T14:14:33+5:302018-06-08T14:14:33+5:30
वाशिम : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगरुळपीर येथील प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागला तर वाशिम येथे निम्म्याच बसेस आज सोडण्यात आल्यात.
वाशिम : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगरुळपीर येथील प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागला तर वाशिम येथे निम्म्याच बसेस आज सोडण्यात आल्यात.
एसटी कर्मचाºयांनी कोणतीही सूचना न दिल्याने पुकारलेल्या संपामुळे एसटी कर्मचाºयांमध्येही गोंधळ दिसून आला. वाशिम येथून दररोज २६ बसेस सकाळी ८ ते १० वाजताच्या दरम्यान सोडण्यासत येतात. परंतु कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे केवळ १२ बसेस सोडण्यात आल्यात. यासंदर्भात आगाराशी संपर्क साधला असता सदर संप अधिकृत नसून कोणत्याही संघटनेने संपाचे आवाहन केले नव्हते, त्यामुळे संपात किती कर्मचारी सहभागी आहेत हे जरी सांगता येत नसले तरी दररोज सोडण्यात येणाºया बसेस कर्मचाºयाअभावी निम्म्याच सोडण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मंगरुळपीर येथे संपात जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी दिसून आल्याने येथून बसेस न सोडण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मंगरुळपीर आगारामध्ये पोलीस कर्मचारी सुध्दा तैनात करण्यात आले होते. कारंजा येथे नियमित बसेस सुटतांना व येतांना दिसून आल्यात. मालेगाव येथेही संप दिसून आला नाही.