एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचे अग्रीम वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:25 PM2020-04-03T17:25:24+5:302020-04-03T17:25:30+5:30
मार्च महिन्यात दिलेल्या वेतनानुसार अग्रीम म्हणून काही रक्कम टाकण्याचा निर्णय २ एप्रिल रोजी घेण्यात आला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळात (एसटी) कार्यरत कर्मचाºयांचे वेतन करण्यासाठी आवश्यक प्रक्रि या पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तथापि, लॉकडाऊनच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून वर्गनिहाय टक्केवारीने कर्मचाºयांच्या खात्यावर मार्च महिन्यात दिलेल्या वेतनानुसार अग्रीम म्हणून काही रक्कम टाकण्याचा निर्णय २ एप्रिल रोजी घेण्यात आला आहे. यानुसार वर्ग १ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर २५ टक्के, वर्ग २ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर ५० टक्के, वर्ग ३ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर ७५ टक्के, तर वर्ग ४ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर १०० टक्के रक्कम टाकण्यात येणार आहे.
एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाºयांच्या एप्रिल महिन्यात अदा करावयाच्या वेतनाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. या सुचनांची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील, तसेच आगारातील लेखा अधिकारी, लेखाकार यांनी काही अडचणी उपस्थित केल्या होत्या. त्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची स्थिती असल्याने कर्मचाºयांचे वेतन परिगणित करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज, हजेरीपत्रक, मार्च महिन्यातील कर्मचाºयांच्या रजेचे आदेश उपलब्ध होण्यात येणाºया अडचणींचा समावेश होता. तथापि, महाराष्ट्र शासनाने ३१ मार्च २०२० रोजीच्या निर्णयाद्वारे विविध वर्गवारीतील कर्मचाºयांना ५० ते १०० टक्के वेतन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला अनुसरून एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाºयांनाही वर्गवारीनुसार मार्च महिन्यातील वेतनाच्या काही प्रमाणात रक्कम अग्रीम म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यात वर्ग १ व २ मधील कर्मचाºयांना ५० टक्के, वर्ग ३ मधील कर्मचाºयांना ७५ टक्के, तर वर्ग ४ मधील कर्मचाºयांना १०० टक्के रक्कम देण्याचे सुचित करण्यात आले आहे.