एसटीमुळे प्रवाशांची सोय; ‘मास्क’ लावायला हयगय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:00+5:302021-03-04T05:18:00+5:30
जिल्ह्यात वाशिम, कारंजा, मंगरूळपीर आणि रिसोड हे चार आगार असून, मानोरा व मालेगाव हे दोन उपआगार कार्यान्वित आहेत. कोरोना ...
जिल्ह्यात वाशिम, कारंजा, मंगरूळपीर आणि रिसोड हे चार आगार असून, मानोरा व मालेगाव हे दोन उपआगार कार्यान्वित आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांपासून बळावले असतानाही प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटीचा प्रवास सुरूच ठेवण्यात आला आहे. प्रवाशांनी मात्र प्रवासादरम्यान नियमित तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरावा, शक्यतोवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावे, बसमधून उतरताना व चढताना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र, एसटीने प्रवास करणाऱ्यांपैकी निम्मे प्रवाशी नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास वाशिम बस स्थानकावर जाऊन एसटी बसमध्ये पाहणी केली असता, हा प्रकार निदर्शनास आला. ही बाब संसर्गाला आमंत्रण देणारी असून, नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
...................
कोट :
एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तोंडाला सदोदित मास्क किंवा रुमालचा वापर करावा, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. एसटीच्या वाहकांकडूनही प्रवासादरम्यान सातत्याने यासंबंधीच्या सूचना दिल्या जात आहेत. प्रवाशांनीही स्वत:च्या संरक्षणासाठी जागरूकता बाळगणे आवश्यक आहे.
- विनोद इलामे, आगार प्रमुख, वाशिम