‘कोरोना’पासून बचावासाठी एसटी कर्मचारी घेताहेत खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:27 PM2020-03-17T14:27:48+5:302020-03-17T14:28:04+5:30

बहुतांश वाहक साधा कापडी मास्क किंवा रुमाल तोंडावर बांधण्यासह गॉगलचा वापरही करीत असल्याचे दिसत आहे. 

ST staff taking precautions to prevent 'corona' | ‘कोरोना’पासून बचावासाठी एसटी कर्मचारी घेताहेत खबरदारी

‘कोरोना’पासून बचावासाठी एसटी कर्मचारी घेताहेत खबरदारी

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. या पृष्ठभुमीवर अत्यावश्यक सेवा असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसवर कर्तव्यास असलेले वाहक खबदारी घेऊन तोंडाला मेडिकेटेड मास्क बांधून आपले कर्तव्य बजावत असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. त्यातच मास्कचा तुटवडा असल्याने अपरिहार्यता म्हणून बहुतांश वाहक साधा कापडी मास्क किंवा रुमाल तोंडावर बांधण्यासह गॉगलचा वापरही करीत असल्याचे दिसत आहे. 
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळत असल्याने शासन, प्रशासन या विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळी प्रयत्न व उपाय योजना करीत आहे. यात एसटी महामंडळानेही त्यांच्या कर्मचाºयांना खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरदिवशी राज्यभरात लाखो लोकांच्या प्रवासाची जबाबदारी पार पाडणाºया चालक, वाहकांसह बसस्थानकावरील कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. तथापि, ही अत्यावश्यक सेवा असल्याने पूर्णपणे बंद ठेवणेही शक्य नाही. अशात एसटीच्या सेवेत असलेल्या चालक, वाहकांसह इतर कर्मचाºयांना कर्तव्य बजावणे अनिवार्य आहे. कर्तव्य बजावत असताना आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून वाहक मंडळी खबरदारी घेत आहेत. त्यासाठी मेडिकेटेड मास्क ते तोंडाला बांधत असून, औषधीच्या दुकानात मागील काही दिवसांत मास्कचा तुटवडा निर्माण झाला असल्याने आपला जीव धोक्यात येऊ नये म्हणून काही वाहक साधा कापडी मास्क किंवा रुमाल बांधून आपले कर्तव्य बजावत असल्याचेही दिसत आहे.
 
प्रवासीवर्गातही सजगता

दरदिवशी एसटीच्या बसगाड्यांत विविध ठिकाणाहून शेकडो प्रवासी प्रवास करतात. आपल्यापैकी कोण्या सहकाºयाला कोरोना विषाणूची लागण झाली अथवा नाही, हे कळने कठीण असते. अशात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची जबाबदारी स्वत:वरच असल्याने बहुतांश प्रवासीही स्वत:सह मुलांच्या तोंडावर मास्क बांधून प्रवास करीत असल्याचे चित्र प्रत्येक बसस्थानकावर पाहायला मिळत आहे.

Web Title: ST staff taking precautions to prevent 'corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.