एस.टी-ट्रॅक्टरची अमोरासमोर धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:07 AM2017-11-21T02:07:38+5:302017-11-21T02:08:03+5:30
मालेगाव: जळगाववरून पुसदकडे जाणारी एस.टी. बस व ट्रॅक्टरमध्ये अमोरासमोर धडक झाल्याची घटना सोमवारी वडप टोलनाक्यानजिक घडली. यावेळी एस.टी. चालकाने प्रसंगावधान राखून बस १५ फूट खोल रोडच्या कडेला नेऊन थांबविली. त्यामुळे आतमध्ये बसून असलेल्या ५0 ते ५५ प्रवाशांचा जीव बचावला.
लोकमत न्यूज नेटवर्क

याबाबत प्राप्त माहितीनुसार, जळगाव ते पुसद ही पुसद आगाराची एस.टी. बस मेहकरवरून मालेगावकडे येत होती. दरम्यान, वडप टोलनजिकच्या पुलावर समोरून भरधाव वेगात येणार्या ट्रॅक्टरने (क्र. एमएच ३७ एल ८0८७) बसला जोरदार धडक दिली. अशाही स्थितीत बसच्या चालकाने नियंत्रण कायम ठेवून मोठय़ा हिंमतीने बस १५ फुट खोल रोडच्या कडेला नेली. या अपघातात विजय थोरगावे, प्रियंका खंडारे, मो.नासी मो.बशीर, शाहीरा बी कादर शहा, आसमा बी नसीर व कादर शाहा कदीर शाह हे सहा प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले; तर उर्वरित ५ ते ६ किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांनी खासगीत उपचार घेतले.
या अपघातामध्ये एस.टी. बसचे २५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद चालक भोपासिंग पवार (रा.कुंभारी, ता.पुसद) यांनी मालेगाव पोलिसांत दिली. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या चालकाने घटनास्थळाहून पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.