एसटीचा प्रवास बंद, पगार मिळण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:41+5:302021-05-21T04:43:41+5:30

जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा लाड या चार शहरांमध्ये एसटी डेपो असून, मालेगाव आणि मानोरा येथे उपआगार कार्यान्वित ...

ST travel closed, confusion about getting salary | एसटीचा प्रवास बंद, पगार मिळण्याबाबत संभ्रम

एसटीचा प्रवास बंद, पगार मिळण्याबाबत संभ्रम

Next

जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा लाड या चार शहरांमध्ये एसटी डेपो असून, मालेगाव आणि मानोरा येथे उपआगार कार्यान्वित आहे. जिल्हाभरात १२०० च्या आसपास चालक, वाहक आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारावर दरमहा ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च होतो. दरम्यान, या सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार वेळेत मिळाला. मात्र गेल्या अनेक दिवसापासून एसटीचा प्रवास बंद असल्याने मे महिन्याचा पगार मिळणार किंवा नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

..................

जिल्ह्यातील एकूण आगार

एकूण कर्मचारी

१२००

सध्याचे रोजचे उत्पन्न

१ लाख

......

महिन्याला पगारावर होणारा खर्च

६० लाख

................

वाशिम आगारात २५० ते ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारावर दरमहा साधारणत: १५ लाखाच्या आसपास खर्च होतो. गेल्या अनेक दिवसापासून एसटीचा प्रवास बंद असतानाही एप्रिल महिन्याचा पगार वेळेत मिळाला. मे महिन्याचाही पगार वेळेतच मिळणार असल्याचे संकेत आहेत.

- विनोद इलामे

आगारप्रमुख, वाशिम

................

एसटीचे चालक सापडले अडचणीत

एसटीची प्रवासी वाहतूक बंद असून चालकांना माल वाहतुकीवर पाठविण्यात येत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात माल नेल्यानंतर तेथून परत येताना माल न भेटल्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.

- डी.आर. काकडे

...........

गतवर्षी अनेक महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्या काळात बहुतांश चालकांना माल वाहतुकीवर नियुक्ती देण्यात आली. यंदाही तशीच परिस्थती उद्भवली आहे.

आर.जी. मानकर

..................

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात माल घेऊन जावे लागते. तेथून परत येतानाही माल घेतल्याशिवाय निघता येत नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रवासी वाहतूक सुरू व्हायला हवी.

- एम.व्ही. लोनसुने

Web Title: ST travel closed, confusion about getting salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.