एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:26+5:302021-07-24T04:24:26+5:30

वाशिम: एसटीचा प्रवास सुरक्षित असताना ट्रॅव्हल्सना प्रवासी पसंती का बरं देतात याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ...

ST travel safe; So why travels? | एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का ?

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का ?

Next

वाशिम: एसटीचा प्रवास सुरक्षित असताना ट्रॅव्हल्सना प्रवासी पसंती का बरं देतात याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आरामदायक प्रवास व बसेसची संख्या यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळल्याचे दिसून आले.

एसटीने प्रवास केल्यास अपघात हाेण्याची शक्यता कमी तसेच अपघात झाल्यानंतही दुखापत झाल्यास महामंडळातर्फे विविध याेजना असतांना अनेक प्रवासी खासगी बसेसने (ट्रॅव्हल्सने) प्रवास करताहेत. लांब ठिकाणी जायचे असल्यास बसमध्ये थकल्यासारखे वाटते तर ट्रॅव्हल्सने प्रवास जाणवत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

...............

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

एसटी महामंडळाच्या बसेसचा वेग मर्यादित असताे. लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वेग व आरामदायक गाड्यांचा वेग ८० च्यावर शक्यताेवर नसताे. खासगी वाहनांची वेग मर्यादा चालकावरच अवलंबून असते.

..........

आराम महत्त्वाचा की सुरक्षित प्रवास

सर्वांनाच सुरक्षित प्रवास हवा असताे यामध्ये दुमत नाही. परंतु एसटी महामंडळाच्या रातराणी बसेसची संख्या अपुरी आहे. तसेच आरामदायक बसेसची संख्याही कमी असल्याने नाईलाजास्तव खासगी बसने प्रवास करावा लागताे.

-नीलेश चव्हाण, वाशिम

एसटी महामंडळाच्या अनेक बसेस भंगार झालेल्या आहेत. बसमध्ये बसल्यानंतर चारही बाजुने हवा, पाणी अंगावर येते. खासगी बसेसप्रमाणे सुविधा दिल्यास काेणीही एसटीनेच प्रवास करेल. सुरक्षित प्रवासाबराेबरच आरामही महत्त्वाचाच.

- नीलेश चाैधरी, वाशिम

एसटीचे अपघात नगण्य

एसटी महामंडळात चालकाची नियुक्ती करून घेताना सर्व नियमांचे पालन व प्रवाशांच्या जबाबदारीबाबत अवगत करण्यात येते. यामुळेच एसटीचे अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. अपघात न करणे, वाहन व्यवस्थित हाताळणे याबाबत कर्मचाऱ्यांचा गाैरव केला जाताे.

-विनाेद इलामे, आगार व्यवस्थापक

..........

Web Title: ST travel safe; So why travels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.