मोप येथे लोकवर्गणीतून साकारणार क्रीडांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:32+5:302021-06-27T04:26:32+5:30
खेळण्यासाठी मैदान उपलब्ध व्हावे, याकरिता येथील तरुणांनी मैदान सफाईसाठी पुढाकार घेतला; मात्र हे कार्य आवाक्याबाहेरचे आहे, असे लक्षात आल्यानंतर ...
खेळण्यासाठी मैदान उपलब्ध व्हावे, याकरिता येथील तरुणांनी मैदान सफाईसाठी पुढाकार घेतला; मात्र हे कार्य आवाक्याबाहेरचे आहे, असे लक्षात आल्यानंतर यासाठी २० हजारांपर्यंत खर्च अपेक्षित आहे, यावरून गावातील काही तरुणांनी सोशल मीडियावर आवाहन केले. त्याला क्रीडाप्रेमी व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत दिवसभरात स्वतःहून तीस हजार रुपयांपर्यंत वर्गणी जमा झाली.
याबाबत स्थानिक शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात क्रीडांगणासाठी मोकळी जागा असून या जागेवर गवत, झुडपे उगवल्याने परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर हागणदारीसाठी उपयोग करत होते, मात्र त्याचे सपाटीकरण व साफसफाई केल्यास हक्काचे क्रीडांगण उपलब्ध होऊ शकते, यासाठी स्थानिक कुमारेश्वर तरुण मंडळाने पुढाकार घेतला. क्रिकेट, धावण्यासाठी स्पीच इत्यादी मैदानी खेळासाठी क्रीडांगण उपलब्ध व्हावे, जमा झालेल्या पैशांतून इतर क्रीडा साहित्य घेता यावे. स्थानिक तरुणांनी स्थानिक सोशल मीडियावर याबाबत आवाहन केले होते. त्यास भरभरून प्रतिसाद मिळत गावातील व गावाबाहेर असलेल्या क्रीडाप्रेमी, शाळेचे माजी विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदवला. एकाच दिवसात ३० हजारांपेक्षा अधिक लोकवर्गणी जमा झाली. सकारात्मक कार्यासाठी घेतलेल्या पुढाकाराने गावातील तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.