दुसर्या दिवशीही कर्मचारी संपावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:22 AM2017-10-12T01:22:46+5:302017-10-12T01:23:46+5:30
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १0 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात दुसर्या दिवशीही वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाल्याने महसूलचे कामकाज ठप्प पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसूल विभागातील अव्वल कारकुन दर्जाच्या कर्मचार्यावर अन्याय होणार असून, अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे.