समृद्ध गाव स्पर्धेंंतर्गत टप्पा ४ चे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:12+5:302021-02-06T05:18:12+5:30
कारंजा : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या आखतवाडा येथे स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात गावचे कार्यकारी ...
कारंजा : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या आखतवाडा येथे स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात गावचे कार्यकारी सरपंच गावंडे, सचिव उपाध्ये, पोलीस पाटील जाधव, जलमित्र देवेंद्र फुके यांच्यासह गावकऱ्यांनी सहभाग घेतला.
पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत आखतवाडा गावाचा समावेश असून, या गावात स्पर्धेतील पहिल्या तीन टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला आहे. त्यानंतर शुक्रवारी चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक रविंद्र लोखंडे यांनी ग्रामपंचायत सदस्य व जलमित्र व गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमात विहिरी, कूपनलिकेची पातळी मोजणे, हंगामनिहाय पीक माहिती सर्व्हे कसा करावा व का करावा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच गावातील काही विहिरींची निवड करून पाणी पातळीसुद्धा मोजमाप करून पाणी फाऊंडेशनच्या अॅपवर टाकण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.