मुद्रांक विक्रेत्यांचा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:06 AM2017-10-10T02:06:43+5:302017-10-10T02:08:55+5:30

वाशिम: राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून त्यावर १0 टक्के ‘मनोती’ मिळावी या व इतर मागण्यांसाठी जिल्हय़ातील मुद्रांक विक्री, दस्तलेखन तसेच ई-चलन तयार करणार्‍या मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सामूहिक बेमुदत बंद पुकारला आहे.

Stamp Sellers Off! | मुद्रांक विक्रेत्यांचा बंद!

मुद्रांक विक्रेत्यांचा बंद!

Next
ठळक मुद्दे१0 टक्के ‘मनोती’ मिळावी या व इतर मागण्यांसाठीसामूहिक बेमुदत बंद पुकारला

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून त्यावर १0 टक्के ‘मनोती’ मिळावी या व इतर मागण्यांसाठी जिल्हय़ातील मुद्रांक विक्री, दस्तलेखन तसेच ई-चलन तयार करणार्‍या मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सामूहिक बेमुदत बंद पुकारला.
ईएसबीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावी, एएसपी ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक यांनाच मिळावी, मयत मुद्रांक विक्रेत्यांचे वारस हक्काने परवाना मिळावा, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा बेमुदत बंद  पुकारण्यात आला आहे. यासंदर्भात २८ फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील मुद्रांक्र विक्रेते दस्तलेखनिक यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली; परंतु अद्याप या मागण्यांवर शासनस्तरावर विचार झाला नाही. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यासमोर बेमुदत बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ९ ऑक्टोबरपासून सामूहिक मुद्रांक विक्री, दस्तलेखन व ई-चलन बनविणार्‍या विक्रेत्यांनी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या बंदमध्ये सहभागी शहरातील मुद्रांक विक्रेते श्याम चानकर, सुरेश निरखी, विनायक अंतरकर, हरिभाऊ खंडाळकर, प्रदीप सातपुते, हरिभाऊ पाईकराव, आल्हाद रोकडे, किशोर पुरी यांनी दिली.
-

Web Title: Stamp Sellers Off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.