अडाण जलशयातील कृषीपंप पुर्ववत सुरू करा; इंझोरी परिसरातील शेतक-यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:54 PM2017-12-13T16:54:26+5:302017-12-13T16:55:11+5:30
इंझोरी (वाशिम): अडाण जलाशयातील कृषी पंपाची विद्युत पुरवठा हा पुर्ववत सुरु करण्यासाठी इंझोरी परिसरातील शेतक-यांनी ११ डिसेंबर रोजी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिका-यासह इतराकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): अडाण जलाशयातील कृषी पंपाची विद्युत पुरवठा हा पुर्ववत सुरु करण्यासाठी इंझोरी परिसरातील शेतक-यांनी ११ डिसेंबर रोजी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिका-यासह इतराकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
अडाण जलाशयामध्ये पाण्याचा साठा हा सन २००४, २००८ व २०१२ च्या तुलनात्मक जास्त प्रमाणात आहे. करिता इंझोरी, जामदरा, घोटी, तोरणाळा, म्हसणी, उंबर्डा , वाघोळा व वाकी आदि गावातील शेतकºयांनी या जलाशयावर आधारीत गहु, हरभरा बियाण्याची पेरणी आॅक्टोंबर महिन्यातच केली आहे .हे बियाणे अंकरुन मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे , तोपर्यंत शासनाच्यावतीने पाणी उपसा करण्याकरिता कोणतेही बंधन घातलेले नव्हते. मात्र अचानक ६ डिसेंबर रोजी मानोरा तहसीलदार यांनी पोलिस बंदोबस्तात या जलाशयावर असणाºया शेतकºयांचे विद्युत पुरवठा खंडीत केला. यामुळे सर्व शेतकरयांची पिके ही सुकणार असुन शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. हे पिक वाचविण्याकरिता तोडलेला विद्युत पुरवठा हा पुर्ववत सुरु करुन आमचे होणारे नुकसान टाकण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यासह संबंधीत विभागाना निवेदनाव्दारे मागणी केली आहे. तर या सोबतच पाटबंधारे विभाग दारव्हा यांनी अडाण जलाशयामधील सतत ८ ते १० दिवस पाणी हा कॅनल वरुन कसा व का सोडण्यात आला याची चौकशी करुन संबधीत कर्मचाºयावर कार्यवाही व्हावी अशी मागणी सुध्दा या गावातील शेतकºयांंनी केली आहे.उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देतांना माजी आमदार प्रकाश डहाके सोबत इंझोरी ,जामदरा, घोटी, तोरणाळा, वाकी, वाघोळा व उंबर्डा येथील बहूसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.