रिसोड येथे तूर खरेदी सुरू
By admin | Published: May 17, 2017 02:10 PM2017-05-17T14:10:35+5:302017-05-17T14:10:35+5:30
नाफेड केंद्रावर १७ मे पासून तूर खरेदीला सुरूवात झाली.
रिसोड : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर रिसोड बाजार समितीत नाफेड केंद्रावर १७ मे पासून तूर खरेदीला सुरूवात झाली. रिसोड येथे नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
मुख्यमंत्री व राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडील शिल्लक तुरदेखील नाफेडमार्फत मार्केटींग फेडरेशनकडून ३१ मे पर्यंत खरेदी केली जाणार आहे. शासनाचे तुर खरेदी योजने अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे नाफेड व डी.एम.ओ.अकोला यांचेमार्फत फक्त रिसोड तालुक्यातील कास्तकारांनी उत्पादीत केलेली तुर खरेदी करण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोंदविलेल्या यादीप्रमाणे ज्या कास्तकारांना दुरध्वनीव्दारे किंवा अन्य प्रकारच्या निरोपाव्दारे बोलावण्यात येत आहे. बाजार समितीतर्फे बोलाविण्यात आलेल्या शेतकऱ्यांनीच १७ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथील मार्केट यार्डमध्ये तूर आणली आहे. येथे ह्यटोकनह्ण घेतल्यानंतर तूर मोजण्याकरिता नंबर लावावा लागत आहे. यापूर्वी रिसोड येथे तालुका खरेदी विक्री संघामार्फत १ एप्रिलपर्यंत २६७६ शेतकऱ्यांची ३१ हजार क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर अंतिम मुदतीपर्यंत नाफेड केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. शासनाने आता ३१ मेपर्यंत नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ दिली. त्यानुसार १७ मे पासून कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे शासकीय दरात तूरीची खरेदी सुरू झाली.