‘डोअर टू डोअर’ कोरोना चाचणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:02+5:302021-05-22T04:37:02+5:30

येथील आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत दररोज नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी केल्या जात आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या यादीमध्ये भर जहागीर येथील रूग्णांची ...

Start the ‘door to door’ corona test | ‘डोअर टू डोअर’ कोरोना चाचणीला प्रारंभ

‘डोअर टू डोअर’ कोरोना चाचणीला प्रारंभ

Next

येथील आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत दररोज नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी केल्या जात आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या यादीमध्ये भर जहागीर येथील रूग्णांची आकडेवारी कधी कमी, तर कधी जास्त राहत होती. मागील काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाला येथे प्रारंभ झाला; मात्र आरोग्य विभागाकडून लस घेण्याआधी कोरोना चाचणी करण्याचे बंधन घातले जात असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा दुसरा डोसच घेतला नसल्याचा प्रकार घडला. त्यामुळे आता स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी, आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याची ‘डोअर टू डोअर’ जाऊन कोरोना चाचणी करण्याची मोहिम आखली आहे. त्यानुसार, या मोहीमेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. मोहिमेसाठी डाॅ. स्मिता बबेरवाल, आरोग्यसेविका कऱ्हाड, आरोग्यसेवक प्रविण सरदार, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवका, ग्रामपंचायत सदस्य महादेव क्षीरसागर, मदतनिस प्रयागबाई जोगदंड यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Start the ‘door to door’ corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.