सुशिक्षीत बेकारांच्या उपोषणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:07 PM2018-08-13T14:07:25+5:302018-08-13T14:09:31+5:30

वाशिम  : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. 

Start of the fast at washim | सुशिक्षीत बेकारांच्या उपोषणास प्रारंभ

सुशिक्षीत बेकारांच्या उपोषणास प्रारंभ

Next
ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेकारांना विनाअट शासकीय सेवेत समाविष्ट करा. वयातून बाद झालेल्या बेकारांना तत्काळ एकरकमी १० लाख रुपय व्यवसायासाठी दयावे.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. 
 शासनास प्रकल्पग्रस्तांच्या यथोचित मागण्यासाठी अनेकवेळा निवेदन,  विनंती अर्ज तथा आंदोलन  केले. परंतु आमच्या  मागणीचा विचार करण्यात आला नाही . याकरिता आमरण उपोषणास बसत असल्याचे म्हटले आहे. उपोषणास बसणाºयांमध्ये वनीता विठ्ठलराव पडघान, महादेव गोविंदराव आढाव, विकास शालीकराम वानखेडे, भगवान नामदेव आंधळे, सुदेश सदाशिव पाचपिले, राजेश शेषराव वानखेडे, विजय चव्हाण, राजेश श्ोषराव  वानखेडे, मधूकर चंपत भगत, सचिन दिवाकर वानखेडे, भगवान पुंडलीक वानखेडे यांचा समावेश आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना उपोषणाबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. यावेळी महादेव गोविंदा अढाव, विकास शालीग्राम वानखेडे, मंगेश मधुकर वानखेडे, सुरेश सदाशिव पाचपीले, सचिन दिवाकर वानखेडे, राजेंद्र देवमनराव वानखेडे, गजेंद्र देवमनराव वानखेडे, रवी गुणवंत पाचपिले, राजेश शेषराव वानखेडे, सुरेश गिºहे , भगवान पुंडलीक वानखेडे यासह अनेकांचा समावेश होता.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या
प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेकारांना विनाअट शासकीय सेवेत समाविष्ट करा
वयातून बाद झालेल्या बेकारांना तत्काळ एकरकमी १० लाख रुपय व्यवसायासाठी दयावे
प्रत्येक प्रकल्पग्रस्त बेकारांना शासकीय जमिन १० एकर दयावी
प्रकल्पग्रस्तांची वयाची अट ४५ वरुन ४८ करावी

Web Title: Start of the fast at washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.