रिसोड येथे मोफत अन्नछत्रास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:22+5:302021-09-19T04:42:22+5:30
रिसोड : येथील जुने बस स्थानकाशेजारी वसलेल्या ऐतिहासिक कालुशा बाबा दर्गा येथे हिंदू-मुस्लीम मित्र परिवाराकडून मोफत अन्नछत्र उपक्रमास सुरुवात ...
रिसोड : येथील जुने बस स्थानकाशेजारी वसलेल्या ऐतिहासिक कालुशा बाबा दर्गा येथे हिंदू-मुस्लीम मित्र परिवाराकडून मोफत अन्नछत्र उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
याअंतर्गत दररोज सकाळी १० वाजता पुरी-भाजी, खिचडी, उपमा, गोडभात, तळीव पदार्थ तयार करून कालुशा बाबा दर्गा परिसरातील बाल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना पुरविले जाणार आहे. हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक म्हणून अखंड अन्नछत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कालुशा बाबा हिंदू-मुस्लीम मित्र परिवाराकडून देण्यात आली.
हिंदू-मुस्लीम बांधवांचे एकतेच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अन्नछत्रातून दरदिवशी बाल रुग्णालयातील गरजवंतांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय भाविक, साधू-महंत, वाटसरू, शासकीय, प्रशासकीय प्रतिनिधी, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक भोजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत. याकामी हसीद खान अब्दुल यावर, शंकर पवार, ओमप्रकाश तळणकर, नरेंद्र अग्रवाल, निखिल देशमुख, महेश देशमुख, प्रवीण देशमुख, शेख फतरू, दादाराव वाळके, कैलास शिंगणे, सैय्यद रियाज योगदान देत आहेत.