‘ऑनलाइन’ शिष्यवृत्ती प्रक्रियेस प्रारंभ!

By Admin | Published: August 22, 2016 11:58 PM2016-08-22T23:58:04+5:302016-08-22T23:58:04+5:30

चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांची ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Start of 'online' scholarship process! | ‘ऑनलाइन’ शिष्यवृत्ती प्रक्रियेस प्रारंभ!

‘ऑनलाइन’ शिष्यवृत्ती प्रक्रियेस प्रारंभ!

googlenewsNext

अमोल कल्याणकर
मालेगाव(जि. वाशिम),दि. २२: शासनाकडून दरवर्षी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृतीच्या माध्यमातून शिक्षण घेण्याकरिता अर्थसहाय्य केले जाते. त्यानुषंगाने यावर्षी २0१६-१७ या चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांची 'ऑनलाइन' पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील पहिली ते दहावीमध्ये शिकणार्‍या मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन व ज्यू या समाज घटकातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक मॅट्रीकपूर्व शिष्यवृती योजनेचा लाभ दिला जातो. सदर विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी बँक खात्यावर १ हजार रुपए जमा केले जातात. तसेच केंद्रप्रमुख यांनी केंद्रांतर्गत २0१५-१६ मधील पात्र विद्यार्थ्यांंंचे ह्यरिनेवलह्ण करून घेण्याच्या सूचना आहेत. जास्तीत जास्त फ्रेश अर्ज ऑनलाईन भरावे लागणार आहेत. दरम्यान, २0१५-२0१६ या शैक्षणिक वर्षांंंत पात्र विद्यार्थ्यांंंच्या याद्या शाळांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. याशिवाय शिष्यवृत्तीचे ह्यऑनलाइनह्ण अर्ज सादर करता येणे शक्य नसल्याने त्यामधे अडथळा येत आहे. ही बाब लक्षात घेवून याद्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे.

पात्रतेचे निकष
एकही विद्यार्थी अल्पसंख्याक मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही, याची शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. शिष्यवृत्तीकरिता शासनाने पात्र ता निकष ठरविले आहेत. यात गतवर्षी विद्यार्थ्याने ५0 टक्के गुण प्राप्त केलेले असावे. पालकाचे उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्याचे आधारकार्ड बंधनकारक आहे.

Web Title: Start of 'online' scholarship process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.