पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ

By admin | Published: April 2, 2017 05:01 PM2017-04-02T17:01:49+5:302017-04-02T17:01:49+5:30

वाशिम : जिल्ह्यात २ एप्रिल रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्याच्या मोहिमेस जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याहस्ते प्रारंभ झाला.

Start of Pulse Polio Vaccination Campaign | पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ

Next

वाशिम : जिल्ह्यात २ एप्रिल रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्याच्या मोहिमेस जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याहस्ते प्रारंभ झाला. यावेळी सर्वप्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाला पोलीओची मात्रा पाजण्यात आली.
जिल्ह्यातील ९४३ बुथवर १ लाख २५ हजार ५८५ बालकांना पोलिओचा डोज दिला जाणार आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित बालकांची संख्या ग्रामीण भागात ९१ हजार १२३; तर नागरी भागात ३४ हजार ४६२ अशी एकूण १ लाख २५ हजार ५८५ इतकी आहे. या सर्वांना चुकता पोलिओचा डोज देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पटेल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. मेहकरकर यांनी सांगितले.

Web Title: Start of Pulse Polio Vaccination Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.