अल्लाडा प्लॉट येथे रेशन दुकान सुरु करा : सिध्दार्थ भगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:26+5:302021-04-01T04:42:26+5:30
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, या प्रभागातील स्वस्त धान्याचे दुकान स्थानांतरीत करुन देवपेठ येथे सुरू केल्यामुळे नागरिकांना ...
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, या प्रभागातील स्वस्त धान्याचे दुकान स्थानांतरीत करुन देवपेठ येथे सुरू केल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर या प्रभागात स्वस्त धान्याचे दुकान संतोषी माता स्वयंसहाय्यता महिला बचत गटामार्फत चालविण्यात येत होते. सदर बचत गटाविरुध्द तक्रारी प्राप्त झाल्याने बचत गटाला चालविण्याकरिता देण्यात आलेले दुकान रद्द करुन देवपेठ येथे एका बचत गटाकडे ते वर्ग करण्यात आले. यामुळे अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर येथील नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेवरील सर्व माल घेण्याकरिता देवपेठ येथे जावे लागत आहे. अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर ते देवपेठ याचे अंतर २ किलोमीटर आहे. अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगरमधील अधिकतर नागरिक हे मोलमजुरी करणारे असल्यामुळे त्यांना सकाळी कामावर निघून जावे लागते. त्यामुळे घरातील महिलांना अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर येथून देवपेठ येथे जाण्यास पुरेसे साधन मिळत नाही तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरात संचार बंदीची परिस्थिती असल्यामुळे शिधापत्रिकेवरील धान्य आणण्याकरिता नागरिकांना कोणतेही साधन उपलब्ध होऊ शकत नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बर्याचशा अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर मधील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना शिधापत्रिकेवरील मिळणार्या मालाची त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याकरिता अल्लाडा प्लॉट व संतोषी मातानगर येथील देवपेठ येथे स्थानांतरीत करण्यात आलेले दुकान अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर येथे सरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.