‘बंद करण्यात आलेली हळद खरेदी सुरू करा!’
By Admin | Published: July 8, 2017 01:47 AM2017-07-08T01:47:41+5:302017-07-08T01:47:41+5:30
वाशिम: हळद खरेदी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप शंकरआप्पा काष्टे यांनी बाजार समिती सभापती यांच्याकडे ७ जुलै रोजी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कृउबासमध्ये काही दिवसाअगोदर मोठ्या थाटामाटात हळद खरेदी सुरू करण्यात आली यामुळे वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता; परंतु अचानक खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सदर खरेदी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप शंकरआप्पा काष्टे यांनी बाजार समिती सभापती यांच्याकडे ७ जुलै रोजी केली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कृउबास वाशिम ने नेमलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल वाशिम बाजार समितीत घेऊन येऊ लागले, त्यामुळे त्यांना जो बाहेरगावी माल घेऊन जाण्याचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता तो बंद झाला होता; परंतु सुरळीत चालू असलेली हळद खरेदी अचानक बंद करण्यात आली व कारण देण्यात आले की खरेदीदार नसल्यामुळे हळद बंद करण्यात येत आहे. खरे तर हळद खरेदीदार माल खरेदीसाठी तयार असताना १ नव्हे ४ खरेदीदार काही लोकांच्या हेकेखोर धोरणामुळेही खरेदी बंद करण्यात आली आहे. खासगी बाजार समितीला फायदा पोहचवण्यासाठी काही संधीसाधू, शेतकरीविरोधी लोकांनी ही खरेदी बंद केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकरी हितासाठी जर खरेदीदार खरेदी करण्यास तयार असतील तर त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी ही कृउबास वाशिमचीच आहे त्या अडचणी दूर करून ताबडतोब ही हळद खरेदी पूवर्वत सुरू करण्यात यावी व शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करून न्याय द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेच्या वतीने कृउबास वाशिमच्या विरोधात सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास कृउबास वाशिम पदाधिकारी व कर्मचारी हे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. यावेळी उपजिल्हा प्रमुख वाशिम माणिकराव देशमुख, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शहर प्रमुख गजानन भादुुंर्गे, उपशहर प्रमुख दिलीप काष्टे, उपशहरप्रमुख गणेश पवार, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, नितीन मडके, अमृता गोरे, शशिकांत पेंढारकर, रामेश्वर वानखेडे, छोटू पट्टे बहादूर, सुरज इंगळे, राजाभय्या पवार, कैलास गोरे, गणेश उद्धवराव गाभणे, रामा नथ्थुजी इंगळे यांच्यासह शिवसैनिक होते.