वाशिम तालुक्यात ‘आॅप्टीकल फायबर’ जोडणीच्या कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 05:46 PM2019-02-18T17:46:08+5:302019-02-18T17:46:31+5:30

वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या वतीने तथा महानेट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३४५ ग्रामपंचायतींमध्ये हाय स्पीड इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे.

Start of work of 'optical fiber' connection in Washim taluka | वाशिम तालुक्यात ‘आॅप्टीकल फायबर’ जोडणीच्या कामास प्रारंभ

वाशिम तालुक्यात ‘आॅप्टीकल फायबर’ जोडणीच्या कामास प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या वतीने तथा महानेट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३४५ ग्रामपंचायतींमध्ये हाय स्पीड इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे. त्यासाठी वाशिम तालुक्यात ‘आॅप्टीकल फायबर’ जोडणीच्या कामास सोमवार, १८ फेब्रूवारीपासून सुरूवात करण्यात आली.
यानिमित्त झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, तहसीलदार बळवंत अरखराव, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद शेख, स्टरलाईट कंपनीचे ओमप्रकाश जयस्वाल, नीलेश जापे, राजेंद्र कापसे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. भारत नेटच्या फेज-२ मध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या पाच तालुक्यांमधील ३४५ ग्रामपंचायतींमध्ये ‘एरियल आॅप्टीकल फायबर केबल’ टाकून हाय स्पीड इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे. त्यापैकी वाशिम तालुक्यातील कामांना मंजूरात मिळाली असून त्यास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. संबंधितांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.

Web Title: Start of work of 'optical fiber' connection in Washim taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.