वाशिम येथे पोलिस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात
By admin | Published: June 6, 2014 12:18 AM2014-06-06T00:18:03+5:302014-06-06T00:33:10+5:30
वाशिम जिल्ह्यात पोलिस शिपाई ११६ पदासाठी ४४४0 अर्ज प्राप्त; ६ जून पासून भरती प्रक्रीयेला सुरुवात
वाशिम: महाराष्ट्र राज्य पोलिस विभागाच्या वतीने जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई या पदासाठी ६ जून पासून भरती प्रक्रीयेला सुरुवात होत असून एकूण ११६ पदांसाठी ४४४0 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सुधिर हिरेमठ यांच्या आदेशान्वये अतिरिक्त पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांनी दिली.
जिल्हा पोलिस मैदान सिव्हील लाईन येथे सदर भरती प्रक्रीया पार पडणार असून जिल्हा भरातील २५0 कर्मचारी भरती प्रक्रीया पार पाडणार आहेत. ६ जून ते १५ जून या दरम्यान होत असलेल्या पोलिस भरती प्रक्रीयेसाठी जिल्हा पोलिस दल सज्जा झाला असून सदर भर ती प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो व जिल्हा पोलिस दलाचे व्हीजनल प थक या प्रक्रीयेवर बारीच नजर ठेवणार आहे.
११६ पदांमध्ये खुला प्रवर्गासाठी ५७ जागा, अनुसुचित जाती साठी १५ जागा, अनुसुचित जाती ८, विजअ २, भजब ३, भाजक ४, भाजड २, विमाप्र २, हमाब २२, महिला ३६ व माजी सैनिक १६ अशा जागांचा समावेश आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन बोगस कागदपत्रांची खातर जमा करण्यात येईल. भरती प्रक्रीये मध्ये उमेदवारांनी एजंट अथवा नातेवाईक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींच्या मार्फत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करु नये अन्यथा अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.