उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, रॅम्पची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:22+5:302021-08-25T04:46:22+5:30
उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्ष, नेत्र शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच रुग्णास शस्त्रक्रियेनंतर वरच्या कक्षात घेऊन जाण्यासाठी रॅम्प नसल्याने अडचणी ...
उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्ष, नेत्र शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच रुग्णास शस्त्रक्रियेनंतर वरच्या कक्षात घेऊन जाण्यासाठी रॅम्प नसल्याने अडचणी येत होत्या, आता या ठिकाणी रॅम्पसह इतरही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासल्यास ते उपलब्ध करू, असे यावेळी राजेंद्र पाटणी यांनी सांगितले. कार्यक्रमात व्यासपीठावर कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, तहसीलदार धीरज मांजरे, डॉ. भाऊसाहेब लहाने, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकिरड, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले, भाजपा नगर सेविका प्राजक्ता महितकर, शहराध्यक्ष महिला मोर्चा पायल तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाय डॉ. पाटील, डॉ. बगाटे, डॉ. संजय पवार व अन्य वैद्यकीय अधिकारी कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाला शहर सरचिटणीस शशी वेळूकर, ता. उपाध्यक्ष राजीव भेंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मंगेश धाने, तालुका सरचिटणीस संकेत नाखले, भाजयुमो उपाध्यक्ष समीर देशपांडे, अक्षय देशमुख, मीरा बांडे, पल्लवी डेंडुळे, रंजना भोरे, अनिता थोरापे, मनोज शिवाल, मोहन पंजवाणी, शुभम गिरी, संविद जगताप, अजिंक्य जवळेकर, राजेंद्र घुले, किशोर धाकतोड, ललित तिवारी, राजेश भागवत, संजय लाहे, सुरेश गिरमकार, राहुल रविराव, शहर सोशल मीडिया प्रमुख जिग्नेश लोढाया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन क्ष किरण विभागप्रमुख रोडे यांनी केले, अशी माहिती संजय भेंडे यांनी दिली.
--------
कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवावा !
आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले की, कोरोना लसीकरणाचे प्रमाण केवळ ३५ टक्के आहे. आपणास लसीकरणाचे प्रमाण लवकरात लवकर किमान ७५ टक्क्यांपर्यंत न्यावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरणामध्ये भाग घ्यावा. आपले कुटुंब, मित्र, आप्त यांना लसीकरण करून घेण्याचा सल्ला द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.