राज्याच्या वित्त मंत्र्यांची संत सखाराम महाराज संस्थानला सपत्नीक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:22 PM2018-06-10T18:22:12+5:302018-06-10T18:22:12+5:30
लोणी बु. (वाशिम) - रिसोड तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज संस्थान लोणी बु. येथे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० जून रोजी भेट देत सपत्नीक पूजा केली.
लोणी बु. (वाशिम) - रिसोड तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज संस्थान लोणी बु. येथे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० जून रोजी भेट देत सपत्नीक पूजा केली. त्यानंतर आमदार अमित झनक व मान्यवरांच्या उपस्थितीत तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील मंजूर कामांचा आढावा घेतला.
ना. मुनगंटीवार हे सकाळी १०.३० वाजता पत्नी साधना व कुटुंबासह श्री संत सखाराम महाराज संस्थान लोणी येथे पोहोचले. यावेळी सपत्नीक संत सखाराम महाराज चरणी अभिषेक अर्पण केला. यावेळी संस्थानचेवतीने कल्याण महाराज जोशी यांनी ना. मुनगंटीवार यांचा सपत्नीक सत्कार केला. त्यानंतर आमदार अमित झनक व अधिकाºयांच्या उपस्थितीत तिर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. २० कोटी रुपयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील काही कामे सुरु झाली असून सदर कामाचा आढावा घेतला. यामध्ये मंदिर परिसरातील नाली, पथदिवे व अन्य कामांचा समावेश आहे. यावेळी आमदार झनक यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा सत्कार केला. दुसºया टप्प्यामध्ये गावामधील काही कामे सुचविली. यामध्ये दलित वस्तीसह संपूर्ण गावात पथदिवे, रस्ते, नाली तसेच झोपडपट्टीवर जाणारा रस्ता, पथदिवे यासंदर्भात झनक यांनी निवेदन दिले. यावर सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.