२९ ग्रामपंचायतींची होणार राज्यस्तरीय तपासणी!

By admin | Published: August 10, 2016 01:26 AM2016-08-10T01:26:05+5:302016-08-10T01:26:05+5:30

वाशिम जिल्ह्यातील हगणदरीमुक्त गावांबाबत विभागीय चमूचा अहवाल; २९ ग्रामपंचायती तिस-या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत.

State scrutiny of 29 Gram Panchayats will be done! | २९ ग्रामपंचायतींची होणार राज्यस्तरीय तपासणी!

२९ ग्रामपंचायतींची होणार राज्यस्तरीय तपासणी!

Next

दादाराव गायकवाड
वाशिम, दि. 0९: जिल्ह्यातील हागणदारीमुक्त ३२ गावांची विभागीय स्तरावरील दुसर्‍या टप्प्यातील तपासणी २७ ते ३0 जुलैदरम्यान करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत. जिल्हा परिषद स्वच्छता मिशन कक्षाकडून ९ ऑगस्ट रोजी ही माहिती प्राप्त झाली.
राज्यात २0१४ पासून स्वच्छ भारत मिशन अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह शौचालय ंबांधण्यासाठी प्रेरित केले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने ह्यबेसलाईनह्ण तपासणी करून गावांतील शौचालयधारकांची माहिती घेऊन शौचालय नसलेल्या कुटुंबाना शौचालय बांधण्याचे आवाहन केले जात आहे. या अभियानांतर्गत २0१५-१६ या आर्थिक वर्षात निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केलेल्या ३२ ग्रामंपचायती जिल्हास्तरावरावरील तपासणीत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या. त्यानंतर हगणदरीमुक्त गावांची माहिती दुसर्‍या टप्प्यातील तपासणीसाठी विभागीय स्तरावर देण्यात आली. अमरावती येथील विभागीय चमूने २७ ते ३१ जुलैदरम्यान संबंधित गावांची तपासणी केली. या चमूने आपला अहवाल वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला. त्यानुसार, ३२ पैकी २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या. विभागीय पथकाने यासंदर्भातील अहवाल राज्याच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला असून, आता राज्यस्तरीय चमूकडूून लवकरच या गावांची तपासणी होणार आहे. याबाबतच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.

Web Title: State scrutiny of 29 Gram Panchayats will be done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.