विविध मागण्यांसाठी अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:40+5:302021-07-01T04:27:40+5:30
निवेदनात नमूद आहे की, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.‘युनिसेफ’ने काही निवडक गावांचा ...
निवेदनात नमूद आहे की, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.‘युनिसेफ’ने काही निवडक गावांचा अभ्यास केला. त्यात गरीब व गरजू मजुरांच्या हाताला काम नसल्याचे नमूद केले. रोजगार हमी योजनेतून गरजू व्यक्तींना काम मिळावे व ९० दिवस काम करणाऱ्या मजुरांना कामगार योजनेचा लाभ मिळावा. दक्षता समितीने गावात येणाऱ्या स्वस्त धान्य वितरणाविषयी सभा घ्यावी. कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोनावर मात करण्यासाठी दक्ष राहावे व ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजनेचे प्रलंबित असलेले अनुदान लवकर मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनावर महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा संघटक अनिता वाघमारे, स्वाती मनवर, संघमित्रा मनवर, ऊर्मिला राजगुरे, साधना सोनोने, सोनाली गावंडे, नीता राऊत, वंदना गोडबोले, कमला भगत, भाग्यश्री रोकडे, कल्पना भगत, राजकन्या भगत, पुष्पा खडसे, सुनीता भगत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.