मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; वाशिममध्ये नाभिक समाजाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 03:16 PM2017-11-18T15:16:15+5:302017-11-18T15:19:31+5:30

वाशिम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीर भाषणातून नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याचा मुद्दा समोर करून समाजबांधवांनी ‘एल्गार’ पुकारला.

Statement of Chief Minister; saloon owener protest in Washim | मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; वाशिममध्ये नाभिक समाजाचा एल्गार

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; वाशिममध्ये नाभिक समाजाचा एल्गार

Next
ठळक मुद्देसलूनची दुकाने बंदराज्यपालांकडे पाठविले निवेदन

वाशिम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीर भाषणातून नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याचा मुद्दा समोर करून समाजबांधवांनी ‘एल्गार’ पुकारला असून शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सलूनची दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्र्यांनी समाजाची माफी मागण्यासंदर्भातील निवेदन राज्यपालांकडे पाठविण्यात आले.

१५ नोव्हेंबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस याठिकाणी भिमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाबाबत बेदरकारपणे वक्तव्य केले. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर शेकडो नाभिक समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Statement of Chief Minister; saloon owener protest in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.