सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:33+5:302021-02-05T09:21:33+5:30
यंग सिटिझन टीमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ९ जानेवारीला भंडारा येथील सरकारी दवाखान्यात अतिशय ...
यंग सिटिझन टीमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ९ जानेवारीला भंडारा येथील सरकारी दवाखान्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत दहा निष्पाप नवजात बालकांचा जळून मृत्यू झाला. राज्यात घडलेली ही काही पहिलीच घटना नव्हती २०१७मध्येसुद्धा नाशिक येथेदेखील अशीच घटना घडली होती. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील फायर ऑडिट दोन महिन्याच्या आत करण्यात यावे, राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे प्राथमिकतेने भरण्यात यावीत, भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू झालेल्या बालकांच्या पालकांचे मानसिक समुपदेशन करण्याची उपाययोजना करावी, तसेच राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे बांधकाम ऑडिट, स्वच्छता ऑडिट, औषध पुरवठा ऑडिट तसेच सामाजिक ऑडिटदेखील करण्यात यावे. अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी पाथ फाउण्डेशन व यंग सिटिझन टीमचे प्रतिनिधी म्हणून आकाश चौधरी, वेदांत नावंदर, जय कुमार राठोड, आकाश राठोड, हरिओम महाकाळ, अंकित भोजने, ऋषिकेश इंगोले, ओम देशमुख, ओम येवले, प्रतीक दुर्गे, आदित्य दुर्गे, अक्षय ठाकरे, सुचित देशमुख, ॲड. वैष्णव इंगोले उपस्थित होते.