वन्यप्राण्यांच्या बंदाेबस्तासाठी वनविभागाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:08+5:302021-07-15T04:28:08+5:30
निवेदनात नमूद केले की, शेतात रोही, रानडुक्कर, हरीण आदी वन्यप्राणी येऊन पिकाची नासाडी करीत आहेत. जंगलव्याप्त परिसरात बहुतांश शेती ...
निवेदनात नमूद केले की, शेतात रोही, रानडुक्कर, हरीण आदी वन्यप्राणी येऊन पिकाची नासाडी करीत आहेत. जंगलव्याप्त परिसरात बहुतांश शेती असल्याने शेतकरी यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी लक्ष देऊन वन्यप्राणी यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा, प्रहारच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रहारचे ओम बलोदे, श्याम पवार, युवराज राठोड, गोलू वाळले, राम राठोड पोहरादेवी, गणेश राठोड वाई, सोनू पवार, राजू राठोड, मोहन जाधव, भारत जाधव, सूर्या राठोड, गणेश जाधव, बाळू राठोड, हेमराज चव्हाण उपस्थित होते.
वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड कार्यालयात हजर नव्हते, त्यामुळे कार्यालयात असणाऱ्या महिला कर्मचारी यांच्याकडे निवेदन द्यावे लागले. अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयात हजर न राहता फिल्डवर असल्याचे सांगून घरी आराम करताना दिसतात. परिणामी, लोकांची कामे होत नाही.
प्रा. ओम बलोदे
प्रहार सेवक, मानोरा