क्रिमीलेअरच्या अटीमधून वगळण्याबाबत कुणबी समाजाचे उपविभागीय अधिकाºयांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:59 PM2017-10-25T12:59:31+5:302017-10-25T13:01:00+5:30
मंगरुळपीर : सकल कुणबी समाज मंगरूळपीर बांधवांचेवतीने २५ आॅक्टोंबर रोजी स्थानिक विश्राम गृहात घेण्यात आलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने कुणबी जातीला क्रिमीलेअर उन्नत गटाच्या अटीमधून न वगळल्यामुळे निषेध व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मंगरूळपीर यांचे मार्फत शासनाला निवेदन सादर केले. तसेच अन्यायाविरुद्ध तीव्र लढा उभारण्याच्या हेतूने सहविचार सभेचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.
या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे , प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश पाटील, वा. क. महल्ले, राज चौधरी,नगर सेवक अनिल गावंडे , डॉ राहुल सुर्वे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी समाजाच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकून समाज अप्रगत आहे व समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी क्रिमीलेअर उन्नत गटाच्या अटी मधून वगळले तर समाजाच्या हिताचे ठरेल हे समाज बांधवांना पटवून दिले. कुणबी समाज बांधवांच्यावतीने नोंदविण्यात आलेल्या आक्षेपाच्या निवेदनात महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाने २८ आॅक्टोंबर २०१४ रोजी शासनास सादर केलेल्या शिफारसी अहवालात क्र. ४९ नुसार ओ.बी.सी. मधील कुणबी प्रवगाला क्रिमीलेअर मधून वगळण्याबाबत शिफारस केलेली नाही. तसेच या बाबत आक्षेप नोंदविण्यासाठी व्यापक प्रमाणात शासनाच्यावतीने प्रसिद्धी देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवांच्यावतीने या निर्णयावर आक्षेप नोंदविण्यासाठी सदर विभागाचे सहसचिव गावित यांना मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी कुणबी समाज बांधवा मधून रुपेश धोटे, प्रवीण सावके, गणेश गावंडे, प्रकाश धोटे, धिरज महल्ले, सुरेश गावंडे, मनोज भोयर, जितेंद्र सुर्वे, शेखर देशमुख, राम व्यवहारे, गजानन निचळ, कृष्णा सावके, आशिष खेडकर, संतोष गांजरे, रवी राऊत, घनश्याम व्यवहारे, श्रीकांत भोयर, जगन्नाथ उगले, विशाल ठोकळ, देविदास शिंदे, एन. आर. सुर्वे, राजेंद्र सुर्वे, अविनाश राऊत, परीक्षित उगले, विष्णु सुर्वे, प्रफुल सुर्वे, यांचे सह शेकडो समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपेश धोटे यांनी तर प्रास्ताविक गोपाल गावंडे यांनी केले.