वहिवाटीचा रस्ता अडविल्याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:02+5:302021-06-09T04:51:02+5:30

भांबदेवी येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन गट नं ८ मध्ये आहे, या शेतीमध्ये जाण्यासाठी गट नंबर ६ मधून वडिलाेपार्जित वहिवाटीचा ...

Statement to Tehsildar regarding obstruction of business | वहिवाटीचा रस्ता अडविल्याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन

वहिवाटीचा रस्ता अडविल्याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन

Next

भांबदेवी येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन गट नं ८ मध्ये आहे, या शेतीमध्ये जाण्यासाठी गट नंबर ६ मधून वडिलाेपार्जित वहिवाटीचा रस्ता आहे. मात्र काशीनाथ जगन्नाथ आखरे यांनी ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांचा हा वहिवाटीचा रस्ता अडवून धमकी दिल्याने शेतकऱ्यांनी सोमवार, ७ जून रोजी तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन देऊन रस्ता मोकळा करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

सदर निवेदनातून शेतकऱ्यांनी गैरअर्जदार आखरे यांनी गट नं. ६ ची दोन वेळा मोजणी करून त्यांच्या शेतीला तार कंपाऊंड, फिनिशिंग केले आहे. या वाटेतील वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांना कायम होता. २०१८ मध्येसुध्दा शेतकर्‍यांना धमकी देऊन रस्ता बंद करण्याचा मार्ग अवलंबिला होता. मात्र शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्याने त्यांनी रस्ता अडविला नव्हता. याबाबीला तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र ५ जून २०२१ रोजी त्यांनी आपल्या पत्नीसोबत रस्त्याच्या मधोमध ॲंगल, तार व काट्या लावून रस्ता बंद केला. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्याशी कोणताही वाद न करता रीतसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. सोबतच ७ जून रोजी तहसीलदार यांना संपूर्ण पुराव्या व कागदपत्रानिशी निवेदन दिले आहे. आखरे यांनी शेतकऱ्यांना वारंवार त्रास देण्याचा मार्ग अवलंबिला असून, दुसऱ्या एका शेतात त्यांनी शासनाच्या ई -क्लास जमिनीवर अतिक्रमण केल्याची माहिती आहे. सोबतच २०१८ मध्ये आखरे यांनी चानेकर यांच्या शेतातील ३० मोठी झाडे तोडली होती. याचीसुध्दा रीतसर तक्रार पोलीस स्टेशन व वनविभागला देण्यात आली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आखरे यांची हिंमत वाढत गेली व त्यांनी शेतकर्‍यांना धमकावणे सुरू केल्याचा आरोप संबंधित शेतकर्‍यांनी केला आहे.

निवेदनावर अन्यायग्रस्त शेतकरी मारोती दाते, प्रमोद कन्नेकर, अरविंद चानेकर, सुरेश चानेकर, पूनमचंद सोमाणी, संजय माने, कैलास माने, तुळशीराम उडाके, ढाकूलकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Statement to Tehsildar regarding obstruction of business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.