महागाईबाबत ‘वंचित’चे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:54+5:302021-06-24T04:27:54+5:30
कोरोना महामारीच्या दुर्दैवी परिस्थितीतही केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारितील जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना ...
कोरोना महामारीच्या दुर्दैवी परिस्थितीतही केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारितील जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्या व सामान्य माणसाला दिलासा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. संजय रोठे, प्रकाश चक्रनारायन, तुषार भगत, पृथ्वीराज राठोड, विजय कांबळे, मुख्तार अहमद, अनिल इंगोले, राजाराम राऊत, माणिक मनवर यांची उपस्थिती होती.
.....................
विविध मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक युनियनचे निवेदन
मानाेरा : ग्रामसेवक संवर्ग कर्मचारी यांचे अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. वेळोवेळी निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्यासाठी अधिकारी यांना विनंती केली; मात्र अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नाही. यासह विविध मागण्यांसदर्भात ग्रामसेवक युनियन संघटनेने गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
सन २०१९ च्या वेतनाचा फरक व वेतन वाढ मिळावी, सेवापुस्तिकाची दुय्यम प्रत द्यावी, सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१९मधील घरभाडे भत्ता मिळावा, ग्रामसेवकांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे, वेतनामधून करण्यात येणाऱ्या कपाती नियमित जमा कराव्या, पगारपत्रके नियमित देण्यात यावी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी नावे पाठवावी, मेडिकल बिले वेळेत द्यावी, ग्रामसेवकांची प्राण किट देण्यात यावी, एका ग्रामसेवक यांच्याकडे एकाच ग्रामपंचायतीचा प्रभार द्यावा, मासिक वेतन वेळेवर करावे, प्रवास भत्ता नियमित वेतनासोबत द्यावा, आदी प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच याबाबत पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन तालुका शाखा मानोरा यांच्यावतीने उपाध्यक्ष जी. के. डिघोडे, सचिव सुनील खाडे यांनी निवेदन दिले आहे.