दारूबंदीसाठी रामटेक येथील महिलांचे धनज पोलीस ठाण्याला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:48+5:302021-07-14T04:46:48+5:30

गावातील वाढत्या दारूच्या प्रमाणाला आळा बसावा व दारूमुळे होणारे संसाराचे नुकसान थांबावे याकरिता रामटेक येथील ग्रामसंघ महिला बचत गटाच्या ...

Statement of women from Ramtek to Dhanaj police station for ban on alcohol | दारूबंदीसाठी रामटेक येथील महिलांचे धनज पोलीस ठाण्याला निवेदन

दारूबंदीसाठी रामटेक येथील महिलांचे धनज पोलीस ठाण्याला निवेदन

googlenewsNext

गावातील वाढत्या दारूच्या प्रमाणाला आळा बसावा व दारूमुळे होणारे संसाराचे नुकसान थांबावे याकरिता रामटेक येथील ग्रामसंघ महिला बचत गटाच्या २० महिलांनी धनज बु. येथील पोलीस ठाण्याला निवेदन देऊन दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हिंगणवाडी रामटेक या गट ग्रामपंचायत असलेल्या हिंगणवाडी येथे १६ जून २०२१ ला दारूच्या नशेत पत्नीकडून पतीची वीट व दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दारू या कारणांमुळे अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रामटेक येथे दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे. याबाबत धनज पोलीस ठाण्याला ग्रामसंघ महिला बचत गटांच्या २० महिलांनी निवेदन देऊन गावातील दारूबंदीबाबत त्वरित दखल घेण्याची विनंती केली आहे.

Web Title: Statement of women from Ramtek to Dhanaj police station for ban on alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.