अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:41 AM2021-01-23T04:41:37+5:302021-01-23T04:41:37+5:30
कोरोनाच्या छायेत सुरक्षित अंतर पाळण्यात आले. समाज महामारीतून मुक्त करताना विविध क्षेत्रांत पसरलेला घनघोर अंधार दूर करण्यासाठी आणि उज्ज्वल ...
कोरोनाच्या छायेत सुरक्षित अंतर पाळण्यात आले. समाज महामारीतून मुक्त करताना विविध क्षेत्रांत पसरलेला घनघोर अंधार दूर करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अखंड प्रकाश कसा तेजोमय राहील, याकरिता हे अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. गाव-खेड्यापासून शहरापर्यंत समाज प्रबोनासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद काम करणार आहे. ज्ञान, उमेद, पावित्र्य, प्रगती, सन्मार्गदर्शन हा यशाचा स्रोत असावा, मानवी जीवन व सृष्टीची वास्तविकता सद्सद्विवेक बुद्धीला प्रेरित करणारी असावी, साऱ्या मानवजातीला आणि विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र कुरआन आणि पैगंबर महंमद या स्रोताच्या अनुषंगाने प्रकाशमान जीवन व्यवस्था इस्लाममध्ये देण्यात आली. संदेश पोहोचविण्यासाठी हँडबिल, फोल्डर, व्हिडीओ क्लिप इत्यादींचा उपयोग करण्यात येईल, शिवाय मशीद परिचय आणि कुरआन प्रवचनाचेही आयोजन केले जाईल. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील कुरआनाच्या प्रती इच्छुक लोकांमध्ये मोफत वितरित केल्या जाणार. या दहा दिवसीय अभियानाला जमात-ए-इस्लामे हिंदचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.