तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:03+5:302021-08-25T04:46:03+5:30

मोसमी पावसाचा पट्टा आता हिमालयाच्या पायथ्याशी सरकत आहे. परिणामी पावसाने ओढ दिली असून, अनेक भागांत दिवसभर निरभ्र आकाशाची स्थिती ...

Stay healthy The rain stopped, the heat increased! | तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला !

तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला !

Next

मोसमी पावसाचा पट्टा आता हिमालयाच्या पायथ्याशी सरकत आहे. परिणामी पावसाने ओढ दिली असून, अनेक भागांत दिवसभर निरभ्र आकाशाची स्थिती राहत आहे. त्यामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत येत असल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ दिसून येत आहे. या वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम होणार असल्याने आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

०००००००००००००००००००००००००००००

महिना - अपेक्षित पाऊस - प्रत्यक्ष पाऊस - किमान तापमान - कमाल तापमान

जून - १०५.४० - १९३.६० - २१.०० - ३८.००

जुलै - २९९.६० - ३४१.४० - २३.०० - ३२.००

ऑगस्ट - १७५.२० - १४६.०० - २३.०० - ३४.००

००००००००००००००००००००

ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस

- ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात १७५.४० मि.मी. पाऊस अपेक्षित असतो.

-प्रत्यक्षात या महिन्यात २४ ऑगस्टपर्यंत १४६.०० मि.मी. पावसाची नोंद झाली.

- जिल्ह्यात जून महिन्यात १९३.६० मि.मी पावसाची नोंद झाली होती.

- तर जुलै महिन्यात जिल्ह्यात ३४१.०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

००००००००००००००००००

वातावरण बदलले घ्या काळजी !

-पावसाने सध्या उघडीप दिल्याने दिवसभर कडक ऊन व रात्री थंडी, तसेच पहाटे धुके पडत असल्याने वातावरणात काही तासांच्या अंतराने कमालीचे बदलताना दिसते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.

-प्रामुख्याने लहान मुले, महिला व वयोवृद्धांत आजाराचे प्रमाण वाढले असून, वातावरणातील बदलामुळे होणारे आजार टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

-पाणी उकळून प्यावे व बाहेरील उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नये. दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळावे, डासांपासून बचावासाठी अंगभर कपडे घालावेत.

- ताप, सर्दी, खोकला असला तरी आजार अंगावर न काढता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी, उपचाराला विलंब न करता आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करून घ्यावी.

Web Title: Stay healthy The rain stopped, the heat increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.