घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ : पोलीसांचे भावनिक आवाहन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 04:33 PM2020-04-03T16:33:58+5:302020-04-03T16:34:03+5:30
‘घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ असे भावनिक आवाहन कर्मचाºयांच्या हाती फलक देऊन करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसगार्पासून जनतेचे संरक्षण व्हावे याकरिता पोलीस विभाग विविध धोरण अंवलंबतांना दिसून येत आहे. ३ एप्रिलपासून पोलीस विभागाच्यावतिने भावनिक आवाहन करुन जनलेता ‘घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ असे भावनिक आवाहन कर्मचाºयांच्या हाती फलक देऊन करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडीयावर सुध्दा याप्रकारचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी कोरोना विषाणुचा संसर्ग पाहता आपल्या कर्मचाºयांच्या हाती विविध वाक्य लिहिलेले भावनिक फलक दिलेत. ते रस्त्यावरुन कोणीही जात असतांना त्यांना दाखवून त्यांची एकप्रकारे चूक लक्षात आणून देत आहेत. पोलीस विभागाच्यावतिने कर्मचाºयांच्या हातात दिलेल्या फलकावर मला तीव वर्षाची मुलगी आहे, माझी आई आजारी आहे, माझी पत्नी माझी चिंता करते पण आम्ही घरी जाऊ शकत नाही. आम्हाला मदत करा घरी सुरक्षित जाण्यासाठी, आम्ही तुमचे रक्षण करु आम्ही आपणास सुरक्षित ठेऊ , कृपया आम्हाला सहकार्य करा, कृपया घरी थांबा तुमच्या स्वतासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, आम्ही वाशिम पोलीस आहोत आणि तुम्ही सुध्दा आमचे कुटुंब आहात असे भावनिक आवाहन केल्या जात आहे.
सदर आवाहन करताना इतर देशामध्ये कोरोना संक्रमीतांची संख्या व झालेले मृत्यूचा आकडा सुध्दा दाखविण्यात येत आहे. आणि भारतात १६३७ संक्रमीत असून मृत्यूसंख्या ३८ आहे. त्यामुळे घरातच रहा व आम्हाला कोरोना विषाणुवर मात करण्याासठी मदत करण्याचे आवाहन केल्या जात आहे. शेवटी घरात राहण्याचा निर्णय आपला आहे, जगामध्ये राहण्याचा निर्णय कोरोना करेल असेही फलक कर्मचाºयांच्या हाती देण्यात आले आहे. या भावनिक आवाहनामुळे पोलीसांची नागरिकांप्रती असलेली तळमळ स्पष्ट होत आहे.