खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 03:31 PM2018-12-09T15:31:24+5:302018-12-09T15:31:54+5:30
वाशिम : सेवाज्येष्ठते नुसार खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना देण्यात येणाºया पदोन्नती प्रक्रियेला शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सेवाज्येष्ठते नुसार खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना देण्यात येणाºया पदोन्नती प्रक्रियेला शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. तथापि, मुख्याध्यापकाचे पद रिक्त असलेल्या शाळेत कामकाज पार पाडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ज्येष्ठ शिक्षकाकडे पदभार सोपविण्याचे निर्देश ४ डिसेंबरच्या पत्रान्वये दिले आहेत.
राज्यातील खासगी शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता व पदोन्नतीबाबत १३ आॅक्टोबर २०१६, २४ जानेवारी २०१७ आणि १४ नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार सुचना पारित करण्यात आल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मधील एक सिव्हील अपील, तसेच २०१७ मधील एका विशेष अनुज्ञा याचिकेवर दिलेल्या निर्णयास अनुसरून शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबतचे निकष महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १०८१ मधील तरतुदीस अनुसरून तपासण्याची तयारी शासनाने केली आहे. त्यामुळे माध्यमिक शाळेतील शिक्षक संवर्गातील नियमावलीच्या अनुसूची ‘फ’ नुसार ‘क’ प्रवर्गात मोडणाºया शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही स्थगित करण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ४ डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे दिले आहेत. या दरम्यानच्या कालावधीत माध्यमिक शाळेतील आर्थिक व दैनंदिन कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठी मुख्याध्यापकांच्या रिक्त जागेचा प्रभार संबंधित शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे नियमानुसार सोपविण्याचे निर्देशही या पत्रातून देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव यांनी हे पत्र सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पाठविले आहे.
शासनाचे पत्र पाहून खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीबाबतच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात येईल.
तानाजी नरळे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जि.प. वाशिम
खाजगी शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे; परंतु या पत्रातील निर्देशांची अंमलबजावणी ही माध्यमिक स्तरावरूनच होणार आहे.
-अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम